ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2022 द

लिंगायत समाजातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या संगमेश्वर तालुक्यातील ओळखले जाणारे *वीरशैव लिंगायत युवामंच* समाजबांधवान तर्फे भव्य ओव्हर आर्म  क्रिकेट स्पर्धेचा थरार दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान मठधामापूर  येथील क्रीडांगणावर रंगणार आहे.
    *स्पर्धेचे पहिले पर्व असूनही यावर्षी रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई* येथील लिंगायत समाजाचे खेळाडू एकत्र एकाच मैदानावर येणार आहेत.लिंगायत समाजातील सर्व न्याती बांधवांना तसेच सर्व क्रिडा प्रेमींना एकत्र आणण्यासाठी आणि लिंगायत समाजातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन या मंडळा तर्फे करण्यात आले आहे.
     संगमेश्वर तालुक्यात ही स्पर्धा प्रथमच भरवण्यात आली असून, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धामापूर गावातील मुले विशेष मेहनत घेत आहेत.त्याचप्रमाणे कुरधुंडा,लोवले,परचुरी, शिवणे येथील  मुले ही या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. 
     या स्पर्धेचे *प्रथम क्रमांकास  रोख रक्कम व आकर्षक चषक , द्वितीय,तृतीय, चतुर्थ क्रमांकास रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट  फलंदाज, गोलंदाज, मालिकाविर, सामनावीर,प्रत्येक संघास सन्मानचिन्ह* अशी अनेक आकर्षक चषके ठेवण्यात आली आहेत.
    ही स्पर्धा *लीग* पद्धतीत असल्यामुळे आतापर्यंत 24 संघांचा समावेश झाला आहे.या स्पर्धेसाठी सर्व संघानी संघ नोंदवून वीरशैव लिंगायत युवामंच मंडळाला सहकार्य केले आहे.तरी सर्व समाज बांधवांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन  कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

टिप्पण्या