रत्नागिरी:लाच घेताना प्रभारी निवासी नायब तहसीलदारला रंगेहाथ पकडले

रत्नागिरी : 
70ब च्या दाव्याच्या निकालाची ऑर्डर बाजूने देण्यासाठी १० हजाराची लाच मागणारा राजापूर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि प्रभारी निवासी नायब तहसीलदार अशोक गजानन शेळके (वय 58 वर्षे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पदभार निवासी नायब तहसीलदार राजापूर, ता.राजापूर, जि. रत्नागिरी, वर्ग-2) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या जाळ्यात अडकला.

यातील तक्रारदार (पुरुष, वय - 45 वर्षे )यांचे पत्नीच्या नावे असलेला 70ब च्या दाव्याच्या निकालाची ऑर्डर त्यांचे बाजूने देण्यासाठी लोकसेवक शेळके यांनी तक्रारदार यांचेकडे 10,000 ते 15,000 रुपये लाचेची मागणी करून ताडजोडीअंती 10,000 रूपये लाच रक्कम स्विकारली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी श्री. पंजाबराव उगले सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे., श्री. अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे., पोलीस उप-अधीक्षक, सुशांत चव्हाण, ला.प्र.वि., रत्नागिरी. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत पो. नि. प्रविण ताटे, स.फौ. संदीप ओगले, पो.ह. संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पो.शि. हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.

Comments