ओमायक्रॉनला गांभीर्यानं घ्या! आठवडाभरात 'येवढे' रुग्ण तर 'येवढे' मृत्यू, WHO ची आकडेवारी


संपूर्ण जग सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या सावटाखाली आहे. ओमायक्रॉननं जगभरात आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू संसर्गाच्या संख्येत सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक अहवालात संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेनं सांगितले की, गेल्या आठवड्यात कोविड-19 संसर्गाची सुमारे 15 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर 43,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, अहवालानुसार मृतांची संख्या स्थिर आहे. त्याचवेळी, आफ्रिका वगळता जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. तर आफ्रिकेत कोविडच्या प्रकरणांमध्ये सुमारे 11 टक्क्यांनी घट झाली आहे.

Comments