मत्स्य विक्रीसाठी आठवडा बाजारातील निर्बंध शिथिल करावेत
मिरकरवाडा महिला मच्छि व्यावसायिकांची सेवा सहकारी संस्थेच्या मच्छि विक्रेत्या महिलांनी मत्स्य विक्रीसाठी आठवडा बाजारातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी केली आहे. मिरकरवाडा महिला मच्छि व्यावसायिकांची सेवा सहकारी संस्थेच्या गरीब व गरजु महिला आठवडा बाजाराच्या ठिकाणी जावून मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. आठवडा बाजार बंद केल्यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छि विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Comments
Post a Comment