वाहनाच्या चाकाखाली सापडून कामगाराचा मृत्यू
मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाला. दिवाकर भूषण पासवान (४५, मूळ रा.बिहार सध्या रा. आंग्रे
फोर्ट , सांडे लावगण , रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी लोडर चालक
सनोज कुमार विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात मयत कामगाराचा मुलगा दिलखूष दिवाकर पासवान ( १८ ,
मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे फोर्ट , सांडेलावगण ,
रत्नागिरी ) याने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार , सोमवारी सकाळी ५ वा. त्याचे
वडील आंग्रे फोर्ट येथे लोडरमधून साखरेची पोती
उतरवत होते. त्यावेळी सनोजकुमार लोडर मागे घेत असताना लोडरच्या मागील चाकाखाली येऊन दिवाकर
पासवानचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस
हवालदार रमेश गावित करत आहेत.
Comments
Post a Comment