आजची रेसीपी: काश्मीरी पुलाव

साहित्य:
• २ वाटी बासमती तांदूळ
• २ कप मिक्स फ्रुट टिन (मिक्स फ्रुट मध्ये अननस, डाळिंबाचे दाणे, चेरी असावयास पाहिजे.)
• ४०० ग्रा. तूप किंवा तेल
• २ चमचे काजू
• १/२ कप मनुका
• १ कांदा
• मीठ 

कृती:
• तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे.
• एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.
• कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कपापेक्षा कमी ठेवावे.
• उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा. 
• थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.
• दुसर्‍या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकून ठेवावे.
• भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे. 
• वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर आवडत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.

Comments