लांजात आंबा-काजूची बाग भस्मसात
लांजा : शहरातील धुंदरे येथे लागलेल्या आगीत आंबा, काजू, नारळ बाग पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
डॉ. मनोहर तिरमारे यांच्या मालकीची ही बाग असून या बागेला बुधवारी 19 जानेवारीला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 200 काजू, 200 आंबा, नारळाची 70 झाडे, 200 ड्रॅगन फ्रूट कलमे होरपळली. बहुतांशी कलमे जळून खाक झाली. यासह पंप, पाईप, दोन एकरवर असलेले ठीबक सिंचन सिस्टीम, एक हजार फूट नेट, सागवान लाकूड इत्यादी साहित्य या आगीमध्ये भस्मसात झाले. आले आणि हळदीची लागवडदेखील केली होती.
आग लागल्याचे तिरमारे यांना कळताच ते लगेचच बागेत गेले. परंतु घटनास्थळी पोहोचण्याआधीच बाग जळून खाक झाली होती. या आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
Comments
Post a Comment