राज्यात सरकार नव्हे, तर टोळीचे राज्य ! देवेंद्र फडणवीस यांचे
मुंबई* : राज्यात सध्या सरकार सत्तेवर नसून टोळीचे राज्य आहे, असे टीकास्त्र सोडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार पळपुटे आणि खंडणीखोर असल्याचा आरोप केला.
भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणाले, या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणीही भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडणे होतात. राज्यात लाखो तरुण वैफल्यग्रस्त आहेत. ते बराच काळ स्पर्धा परीक्षांची तयारी मनापासून करतात. पण त्या परीक्षा मंत्रालयात आधीच ’ठरवून’ ठेवलेल्या असतात. गैरप्रकार करणाऱ्या न्यासा, जीए सॉफ्टवेअरसारख्या कंपन्यांनाच परीक्षांची कामे दिले जातात.
विद्यापीठांनाही शासकीय महामंडळे करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे चर्चेविना रात्री उशीरा विधिमंडळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. कुलगुरुंना ‘बाबू’ करणारा हा प्रस्तावित कायदा असून विद्यापीठे पदव्या विकणारी केंद्रे होतील.
अधिसभेचे संचालन मंत्री करतील. विद्यापीठांना राजकारण व भ्रष्टाचाराचे अड्डे बनविण्याचे सरकारचे धोरण असल्याने उच्चशिक्षणमंत्र्यांनी या कायद्याद्वारे विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक अधिकार आपल्याकडे घेतले आहेत.त्यामुळे मोठय़ा संघर्षांला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
---------------------------------
-----------------------------------
*👇आमच्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या*
https://www.youtube.com/channel/UCKANIVl7ykMeIhclrbYORBA
------------------------
Comments
Post a Comment