रत्नागिरी-मडगाव आणखी १५ दिवस रद्द
कोकण मार्गावरील रत्नागिरी ते मडगावपर्यंत विद्युतीकरणासह बोगद्यांमधील देखभालीची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. या मार्गावर पायाभूत सुविधांच्या कामांसाठीच कोकण
मार्गावर धावणारी १०१०१/१०१०२ क्रमांकाची रत्नागिरी-मडगाव नियमित गाडी आणखी १५ दिवस रद्द करण्यात आली आहे.
मार्गावर धावणारी १०१०१/१०१०२ क्रमांकाची रत्नागिरी-मडगाव नियमित गाडी आणखी १५ दिवस रद्द करण्यात आली आहे.
त्यानुसार ही गाडी २ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. यापूर्वीही सलग दोनवेळा रत्नागिरी-मडगाव १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आली होती. आणखी १५ दिवस ही गाडी रद्द करण्यात आल्याने रत्नागिरी-मडगावदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Comments
Post a Comment