महिला काँग्रेस संघटना बळकट करणार!; चिपळुणातील बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार
महिला संघटना बळकट करून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षवाढीवर अधिक भर देण्याचा निर्धार चिपळूणमध्ये मंगळवारी (ता. 18) झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
चिपळुणातील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मा. रुपाली सावंत आणि रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मा. रुपाली सावंत आणि ॲड. मा. अश्विनी आगाशे यांच्यासह मा. प्रशांत यादव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेविका सफा गोठे, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रवीना गुजर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यश पिसे आदी उपस्थित होते.
..........
महिला पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र
विविध पदांवर नव्याने निवड झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना या बैठकीत मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र प्रदान करण्यात आले. रवीना गुजर यांना रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचे, गौरी रेळेकर, वैशाली विचारे आणि अश्विनी भुस्कुटे यांना चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचे तर मीरा नारकर यांना महिला काँग्रेस चिपळूण शहर उपाध्यक्षपदाचे निवडपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment