राजापूर पंचायत समिती सदस्य निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत, स्विय सहाय्यकाने हात उचलला, संपुर्ण शिवसेनेत संतापाची लाट, राजापूरचे शिवसेना पदाधिकारी ठाम निर्णय घेईनात

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातिल एका बड्या लोकप्रतिनिधिच्या स्विय सहाय्यकाने पंचायत समिती सदस्यावर हात उगारल्याच्या प्रकरणामुळे आता शिवसेनेत संतप्त वातावरण निर्माण झाले असून अणसुरे, सागवे या भागात राजकिय खळबाते सुरु झाली आहेत. तर या प्रकरणामुळे राजापूरातील शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या मनस्तापात आणखी भर पडली असून कुणाला धरु आणि कुणाला सोडू अशी अवस्था झाली आहे. 
स्विय सहाय्यकाने दांडे अणसुरे येथील मच्छिमार ओटा उभारणीच्या वादातून रत्नागिरी येथे राजापूर पंचायत समिती सदस्यावर हात उगारल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. राजापूरातील अणसुरे विभागातील मच्छिमार ओटा उभारणीचे काम आपल्या मर्जितील ठेकेदाराला देण्याचा डाव यामुळे उघड झाला असल्याचेही बोलले जात आहे. पालकमंत्री अनिल परब यांच्या मंजुरीने सदरचे काम मंजूर झाले. सदर कामाचे लाईन आऊट करताना स्थानिक पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत याना विचारात का घेतले गेले नाही अस सवाल पंचायत समिती सदस्याने उपस्थित केला. हा पंचायत समिती सदस्य रत्नागिरीच्या पतन विभागाच्या अधिका-यांशी जाऊन भेटला. तिथे कोणत्याही प्रकाराचा राडा किंवा वादंग निर्माण होईल अशी परिस्थिती झाली नव्हती. मात्र या पंचायत समिती सदस्याबाबत अपप्रचार करण्यात आला. आणि स्विय सहाय्यकाने केलेले कृत्य लपवण्याचा डाव रचण्यात आला. मात्र सत्य परिस्थितीबाबत हे बडे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या सर्व प्रकारामुळे अणसुरे या भागात शिवसेनेत संतापाचे वातावरण असून पंचायत समिती सदस्य निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

Comments