रत्नागिरिच्या कार्यालयात राजापूर पंचायत समिती सदस्यावर स्विय सहाय्यकाने हात उचलला; राजापूरच्या शिवसेनेत संतप्त वातावरण, बुधवारी राजापूर शासकीय विश्रामगृहात न्याय मिळाला नाही

राजापूरातील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य आणि एका बड्या लोकप्रतिनिधिच्या स्विय सहाय्यकामध्ये रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील एका कार्यालयात झालेल्या मारामारीची जोरदार चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सुरु झाली असून चहा पेक्षा किटली गरम झाल्याने सामान्य शिवसैनिकांमधुन तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान त्या पंचायत समिती सदस्यवर हात उगारल्याची घटना घडल्याने शिवसेनेचा मोठा गट तिव्र नाराजी व्यक्त करत आहे. यासंदर्भात दोन्हीही व्यक्तींना बुधवारी राजापूर शासकीय विश्रामगृहात बोलावण्यात आले. मात्र तिथेही त्या पंचायत समिती सदस्याला हात उगारल्याच्या प्रकरणावरुन न्याय मिळाला नाही. त्यामुळे तो पंचायत समिती समिती सदस्य तिव्र नाराज असून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारित असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु आहे. चहा पेक्षा किटली गरम झाली खरी. पण त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या एका विकास कामाच्या संदर्भात रत्नागिरीत बैठक झाली. आणि याच बैठकीत पहिला हात या स्विय सहाय्यकाने उचलला. त्यानंतर दोघांच्या जोरदार बाचाबाची सुरु झाली. एकमेकांवर हात उचलले. पण या सगळ्यात प्रामाणिक शिवसैनिकाचा अपमान झाल्याने शिवसेनेत नेमके काय चाललेय असा सवाल उपस्थित केला जात आहेत. विकासकामे देताना पालकमंत्री नेमके आमदारांची शिफारस घेतात की तळागाळातील शिवसैनिकांची मते विचारुन कामे मंजूर करुन दिली जातात? राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र पालकमंत्री कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या कामे मंजूर करुन दिली जातात का? विकास सर्व समावेशक होतोय का? त्यातच शिवसेनेच्या पदाधिका-यांची अशा प्रकारची आपापसातच वर्तणूक असेल तर जनतेने काय आदर्श घ्यावा? असे असंख्य सवाल संपूर्ण जिल्ह्यातूनच उपस्थित होऊ लागले आहेत. 

Comments