रत्नागिरी येथे पहिलीतील मुलींशी अश्लील चाळे;शिक्षकाला अटक
रत्नागिरी तालुक्यातील पालीनजीकच्या एका गावात प्राथमिक शाळेत पहिलीत शिकणाऱ्या मुलींशी शाळेतील ५० वर्षीय शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा
प्रकार उघड झाला आहे. या शिक्षकाला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षकाने असा प्रकार यापूर्वीही केला होता. त्यावेळी त्याला चांगलाच प्रसाद मिळाला होता. आता पुन्हा पालक
आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील पालीनजीकच्या एका गावातील प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. पहिलीतील चिमुरड्या मुलींशी हा शिक्षक अश्लील चाळे करत असे. याबाबत पालकांना माहिती
मिळाल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक गाठले. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर हा शिक्षक भाड्याच्या खोलीत राहतो. तेथून
त्याची शाळाजवळ आहे. शाळेत येणाऱ्या पहिलीतील मुलींशी तो चाळे करत असे. मुलींनी याची माहिती पालकांना दिल्यानंतर सर्वच पालक आक्रमक झाले. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.पोस्कोअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून , रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Comments
Post a Comment