राजीवडा नाक्यात पकडली हातभट्टीची दारू
रत्नागिरी:
शहरातील राजीवडा नाका येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 260 रुपयांची 5 लिटर दारु विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवार 10 जानेवारी रोजी रात्री 8.15 वा.करण्यात आली.
शर्मिला चंद्रकांत पवार (60,रा.परटवणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.तिच्या विरोधात महिला पोलिस हवालदार पुष्पलता शांताराम नाडणकर यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,शर्मिला पवार ही राजीवडा नाका येथील बंद शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बागळगून असताना ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार राठोड करत आहेत.
Comments
Post a Comment