आयएनएस रणवीर' या नौदलाच्या युद्धनौकेवर शक्तिशाली स्फोट,तीन जवान शहीद झाले तर ११ जण जखमी


आयएनएस रणवीर' या  नौदलाच्या युद्धनौकेवर शक्तिशाली स्फोट,तीन जवान शहीद झाले तर ११ जण जखमी 

 आयएनएस रणवीर' या  नौदलाच्या युद्धनौकेवर शक्तिशाली स्फोट झाल्याची दुर्घटना काल मंगळवारी मुंबईनजीक भरसमुद्रात घडली. 'रणवीर' कुलाब्याच्या नौदल तळावर येत असतानाच हा स्फोट झाला.या स्फोटात तीन जवान शहीद झाले तर ११ जण जखमी झाले. जखमींवर मुंबईतील नौदल रुग्णालयात उपचार सुरू असून कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले.

'आयएनएस रणवीर' ही युद्धनौका डिस्ट्रॉयर श्रेणीतील आहे. या युद्धनौकेच्या आतील भागात हा स्फोट झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. कोणत्याही स्पह्टक शस्त्र्ाांमुळे हा स्फोट झालेला नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. स्फोटामागचे कारण शोधण्यासाठी नौदलाने याप्रकरणी तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नौकेवरील कर्मचारी स्पह्टाच्या आवाजाने सावध झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.


Comments