मच्छीमारांची तीव्र आंदोलने!जाणून घ्या कारण!

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तील सुधारणेच्या नियमाला विरोध करण्यासाठी पर्ससीन नेट मच्छीमारांनी एकाचवेळी तीन ठिकाणी आंदोलने केली. मिरकरवाडा बंदरातील सर्व नौकांवर काळे झेंडे लावण्यात आले होते. पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचवेळी पर्ससीन नेट मच्छीमारांचे साखळी उपोषणही सुरुच आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनात सुधारणा करण्यात आली या सुधारित कायद्यामुळे पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्यांवर अन्याय झाला आहे १ जानेवारीपासून या मच्छीमार नौकांना केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाण्यास राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रातून मार्गिका दिली जात नाही.

Comments