आकाशवाणीवरून स्थानिक कार्यक्रम होणार बंद???
आकाशवाणीच्या जिल्हा केंद्रांवरील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचेच कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित करण्याचा आदेश प्रसार भारतीने
दिला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे कळते. या निर्णयाला रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांनी व श्रोतृवर्गानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात आकाशवाणीची जिल्हास्तरावर २८ केंद्र आहेत.यामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव,परभणी, कोल्हापूर, सांगलीसह रत्नागिरी ही मोठी केंद्र
आहेत. या केंद्रांवरुन स्थानिक कार्यक्रमांचेही प्रक्षेपण होत असे. त्यामुळे स्थानिक निवेदक, कलाकार यांना संधी मिळत. तसेच स्थानिक कार्यक्रमांनाही तेथे व्यासपीठ उपलब्ध होत असे. त्यातून प्रत्येक शहराची आणि शहरातल्या कलाकारांची तसेच परिसराची
माहिती श्रोत्यांना घरबसल्या मिळत होती. या नव्या आदेशामुळे स्थानिक कलाकारांच्या नाराजी निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment