रत्नागिरी:गावठी बॉम्बप्रकरणी आणखी दोघे गजाआड
शनिवारी सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथून जिवंत नऊ गावठी हात बॉम्बची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांच्या अन्य दोन साथिदारांच्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातून मुसक्या आवळल्या. मंगळवार त्यांना न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने
चारही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
नारायण उर्फ दर्शन गणेश चव्हाण (२२), पांडुरंग यशवंत परब ( ३५, दोन्ही रा. परबवाडीरा , परबवाडीवजराठ ता. वेंगुर्ला , सिंधुदुर्ग ) अशी सोमवारी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या पूर्वी रामा सुरेश पालयेकर ( २२ , रा. वडखोल वेंगुर्ला ,
सिंधुदुर्ग ) आणि श्रीकृष्ण केशवहळदणकर (२४,रा. गावडेश्वर मंदिराजवळ वेंगुर्ला , सिंधुदुर्ग ) या दोघांना हाखंबा येथून अटक करुन त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपयांचे ९ गावठी हात बॉम्ब , एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान,सोमवारी ग्रामीण पोलिसांचे पथक वेंगुर्ला येथे रवाना
झाले होते. मंगळवारी पालयेकर आणि हळदणकर या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांनाही त्यांच्या साथिदारांच्या सोबत न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
Comments
Post a Comment