अज्ञाताने पेट्रोल ओतत पेटवली दुचाकी!!
पावस नालेवठार येथे अज्ञाताने पेट्रोल ओतत पेटवली दुचाकी
तालुक्यातील पावस नालेवठार येथे अज्ञाताने दुचाकिवर पेट्रोल ओतत पेटवून अंदाजे 25 हजार रुपयांचे नुकसान केले.ही घटना गुरुवार 27 जानेवारी रोजी मध्यरात्री 2.45 वा.घडली.
याबाबत महेश लक्ष्मण तरळ(38, रा.पावस नालेवठार,रत्नागिरी) यांनी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुरुवारी रात्री त्यांनी आपली पॅशन प्रो दुचाकि (एमएच-08-एक्स-4854) घराच्याजवळ उभी करुन ठेवली होती. अज्ञाताने मध्यरात्री त्यावर पेट्रोल ओतून ती पेटवत नुकसान केले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक गावीत करत आहेत.
Comments
Post a Comment