माजी नगरसेविका शितल पटेल यांना राज्यस्तरीय रत्नसिंधू समाजरत्न पुरस्कार प्रदान

रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच महाराष्ट्र राज्यस्तरीय रत्नसिंधू समाजरत्न पुरस्कार 2021 वितरण सोहळा राजापूर तालुक्यात ओणी येथे साई विमलेश्वर मंगल कार्यालय येथे पार पडला. त्या वेळी राजापूर नगरपरिषद माजी नगरसेविका, माजी उपनगराध्यक्षा, भाजपा जि.कार्यकारणी सदस्य शितल पटेल यांना अध्यक्ष सुरेश कुराडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या समयी साहीत्यीका सरिता पवार, विजय वडेवार, प्राचार्य मारूती कांबळे, प्रभाकर कांबळे, संजय जाधव आदी उपस्थित होते. तसेच सदर पुरस्कारामुळे कार्यात गति व कामासाठी प्रोत्साहन देऊन प्रेरणादायी करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजापूर शहर व तालुक्यातुन अनेकांकडून शितल पटेल यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments