शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू?

राज्यातील शाळा महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे विचाराधीन असलेल्या
प्रस्तावावर निर्णय येणार आहे. 

मागील 20 दिवसांपासून बंद असलेले वर्ग पुन्हा भरवण्याला आता हिरवा कंदील मिळणार आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीआधी ऑफलाईन वर्ग सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, राज्याच्या शिक्षण विभागाने मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी अनुकूलता दर्शवल्याची माहिती समोर येत आहे

. येणाऱ्या काळात सुधारणाऱ्या परिस्थितीनुसार माध्यमिक शाळा आणि कॉलेज सुरु करणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहले आहे. 

स्थानिक परिस्थिती हाताळून आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवण्यात यावं, असं त्यांनी सुचवलं आहे.यावर मंत्री वर्षा गायकवाड यांनीही अनुकूलता दर्शवली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आल्याचं
समोर आलं आहे.

Comments