रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका शिवसेनेत खलबते सुरु, उमेदवार तेच देणार की बदलणार? राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा

आगामी रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेत राजकिय खलबते सुरु झाली आहेत. काही पदाधिकारी व कार्यकर्ते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेत आहेत तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेत आहेत. मात्र रत्नागिरीतील उमेदवार निश्चिती नेमके कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीत शट प्रतिशत शिवसेना म्हणजेच सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत अशा अपेक्षा पक्ष श्रेष्ठि यांची आहे. परंतू रत्नागिरी शहरात राष्ट्रवादी सह भाजपाची देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे काही प्रभागात उमेदवार तेच पुन्हा द्यावेत की उमेदवार बदलावेत अशा जोरदरा चर्चा शिवसेनेच्या राजकिय वर्तुळात सुरु आहेत. काही नगरसेवक तर सुमारे तीस ते पसतीस वर्षे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावर आहेत. आता वयोवृद्धही झाले आहेत. अशा उमेदवाराना त्या त्या मतदारसंघात उमेदवारी पुन्हा द्यावी की देऊ नये याबाबत विचारविनिमय सुरु आहे. 
रत्नागिरी तालुक्यात ग्रामिण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत खलबते सुरु झाली आहेत. शिवसेनेत इच्छूकांची भाऊ गर्दी आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची हे निश्चित करण्याचा पेच नेत्यांपुढे आहे. रत्नागिरिच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेना नेत्यांना भेटी गाठी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची जोरात रेलचेल सुरु आहे. त्यामुळे नेत्यांना देखील कोणत्या कार्यकर्त्याला कोणता शब्द द्यावा हा देखील पेच आहे. अजून निवडणूका जाहिर झालेल्या नाहित. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते मात्र जोमात कामाला लागलेत एव्हढे मात्र निश्चीत. 

Comments