तरुणीची गळफास घेत आत्महत्या.

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील तरुणाने घराच्या वाश्याला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा.उघडकीस आली. दीपक एकनाथ रामाणे (३०, रा. वरवडे महाजनवाडी, रत्नागिरी) असे
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत प्रभाकर नारायण रामाणे (४९,रा. वरवडे महाजनवाडी, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी दीपकने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या लाकडी वाश्याला गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक मनवल करत आहेत.

Comments