जिल्ह्यातील शाळा 'या' तारखे पासून पुन्हा सुरू: पालकमंत्री
रत्नागिरीः- ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. छत्रपती शिवाजी
स्टेडियम येथील भाषणादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या स्थिर असल्याने शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळा 23 जानेवारीपासून सुरु झाल्या पण जिल्ह्यात स्थानिक पातळीवर 26 जानेवारीला निर्णय घेण्यात येणार होता.जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची
माहिती आज पालकमंत्र्यांनी दिली.
Comments
Post a Comment