मौजे बाणकोट - बौध्दवाडी चे रहिवाशी श्री. दिनेश पवार यांचा आरोप, जिल्हाधिकऱ्यांकडे तक्रार.
ग्राम पंचायत असेसमेंट वर पक्क्या घरांची नोंद असताना घरकुले मंजूर ........... पडव्यांचे बांधकाम ....... गरजवंत वंचित.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अधक्ष कार्यकारी समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी यांनी दिलेल्या प्रशासकीय मंजुरी आदेशामध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्ती यांचे गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) व पंचायत समितीचे नियमित शाखा अभियंता यांनी पालन केलेले दिसून येते नाही. त्यामुळे संबंधितावर व शासनाची फसवणूक, दिशाभूल करून स्वतःच्या नावावर घर असून सुध्दा बेघर दाखून घरकुलासाठी अनुदान मंजूर करून केवळ पडव्या बांधून घेतल्या आहेत त्याच्यावरही दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. प्रशासकीय मंजुरी १ लाख असताना ऐकला १ लाख २० हजार वितरित केले आहेत. ग्राम पंचायतीने घर नावावर असूनही बेघर असल्याचा दाखला दिला व त्याला गट विकास अधिकारी यांनी शिफारस केली आहे. याच्याच आधारे लाभ मिळविला आहे. लाभार्थी आणि सबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनेश पवार यांनी केली आहे. ज्यांना खरोखरच लाभ मिळायला पाहिजे त्यांना देण्यात येत नाही त्यांना नियम दाखविले जातात. तसेच वाडीतील काहीना घरकुले मंजूर झाली होती पण संपूर्ण घर तोडून घराचे बांधकाम करावे लागेल असे त्यांना ग्राम पंचायत मार्फत सांगण्यात आले म्हणून त्यांनी घरकुल परत केली आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सबंधितावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत पत्र व्यवहार सुरू आहे. प्रशासकीय आदेशातिल १ ते २३ अटी व शर्तीचे पालन न करता त्याचे उल्लंघन करून मजुरी दिली. चौकशी करू चौकशी अहवाल चुकीचा, दिशाभूल करणारा देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपले स्तरावर योग्य ती कार्यवाही करून संबंधितांना परस्पर कळविण्यात यावे असे दिनाक १० फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या पत्रानव्ये कळविले आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा त्यांना दिनाक ०९ डिसेंबर, २०२१ रोजी कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविलेले आहे सदर पत्रात कार्यवाही झाली नाही तर कोर्ट केस दाखल करण्यात येईल असे नमूद केलेले आहे व त्याची प्रत मा. जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना / आदेश देण्यात यावेत यासाठी दिलेली आहे. तसेच मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी याना माहिती व पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर म्हणून प्रत दिलेली आहे.
Comments
Post a Comment