कोकण रेल्वेच्या "या" एक्सप्रेस ट्रेनमधून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
कोकण रेल्वे मार्गावर मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेच्या साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे , तर एका प्रवाशाचा १५ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सुधा सुभाष सावंत ( रा. डोंगरी अंधेरी मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १९ जानेवारी रोजी रात्री घडली. त्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यानी त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन आसनावर ठेवलेली पर्स लांबवली व यामध्ये साडेचार लाख रुपयांचे दागिने लंपास केले. त्यात दोन लाखांचे मंगळसूत्र , १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या , ५५ हजारांची सोन्याची चेन असा ऐवज होता. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या तक्रारीत , संजय मधुकर जायपाटील (रा. मुरुड , रायगड ) हे पटना एक्स्प्रे समधून प्रवास करीत असताना चिपळूण दरम्यान गाडी आली असता मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये त्यांचे 15 हजारांचे नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment