कुरधुंडा येथे दोन दुचाकींमध्ये अपघात ; ४जण जखमी
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा बंदर येथे दोन दुचाकींमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार या अपघाताची फिर्याद शैलेश पाटणे यांनी दिली आहे.
अपघातात जयेश शांताराम भरणकर , सागर पंडित ,संतोष फराकटे व संदेश चव्हाण चारही राहणार कोळंबे
हे जखमी झाले आहेत.
Comments
Post a Comment