आंबा घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळली स्विफ्ट गाडी चालकाचा जागीच मृत्यू
साखरपा:
आंबा घाटात स्विफ्ट गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळून बुधवार दिनांक १२ जानेवारी रोजी भीषण अपघात घडला. अपघातात चालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात विसावा पॉइंट नजीक घाटाचा कठडा तोडून सुमारे ५०० फूट खोल दरीत बुधवारी दुपारी स्विफ्ट गाडी कोसळली.रस्त्याच्या अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजारामपुरी येथील संजय गणेश जोशी (वय६३वर्षें, ) हे आपल्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच ०९, डी १०९९ घेउन कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत होते.
आंबा घाटात जोशी यांचे स्विफ्ट वरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती समजताच साखरपा दुरर्क्षेत्रचे कर्मचारी घटना स्थळी पोहचले. साखरपा पोलिस,राजू काकडे हेल्प अकॅडमी,आंबा येथील स्थानिक तरुणांच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
यावेळी दुदैविरित्या चालकाचा मृत्यू झाल्याचे आढळले. देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विद्या पाटील,सचिन भुजबळराव,संदीप जाधव, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, किशोर जोयशी,अमरसिंग पाटील व टीम आदी कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते.
मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आण्यात आला.मृताचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते.नरेंद्र महाराज संस्थानची ॲम्बुलन्स घटनास्थळी उपस्थित होती. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये राजू काकडे हेल्प अकॅडमीचे राजा गायकवाड, सिध्येश वेल्हाळ, चंद्रकांत भोसले, संतोष मुंडेकर, संजय माईन, दिलीप गुरव, मंगेश खळे, राजू वनकुद्रे सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment