काका-पुतण्याच्या भांडणानंतर दुकानफोडण्याची धमकी
रत्नागिरी शहरातील एका नावाजलेल्या ठिकाणी काका - पुतण्याचे भांडण जुंपले. यातील वसुलीच्या कारणावरून शिवीगाळही झाली आणि अखेर काकाने पुतण्याला दुकाचा अर्धा भाग खाली करुन दे असे सांगत न ऐकल्यास दुकान फोडण्याची धमकी दिली. रत्नागिरी शहरातील एका नवाजलेल्या ठिकाणी दुकान असून या
ठिकाणच्या पुतण्याने वसुली केली नाही.अनेक दिवस होऊनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिला. अखेर काकाने
दुकानात जात वसुली होत नसेल तर दुकानाचा अर्धा भाग खाली करुन दे अन्यथा दुकान फोडून टाकीन ,अशी धमकी दिली. याची चर्चा रत्नागिरी शहरात सुरु झाली असून पोलिसांनीही हा प्रश्न सामोपचाराने
मिटवला आहे.
Comments
Post a Comment