आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा..

 
  
  ताडदेव येथील कमला इमारतीस लागलेली आग दुर्देवी असून येथे बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथील नेमकी परिस्थिती, मदत कार्य याबाबत माहिती घेण्यासाठी या ठिकाणाला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. तसेच रहिवाशांशी बोलून त्यांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 


या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकार 5 लाख रुपयांची भरपाई देईल, अशी घोषणा त्यांनी केली. आतापर्यंत या दुर्घटनेत 7 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Comments