गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णामध्ये वाढ!

जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तब्बल पावणे तीनशे नवे रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा पाचशेच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात
मागील नऊ दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आरोग्य यंत्रणाही दक्ष झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. वाढत्या
गर्दीमुळे आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत अगदी झोकात होणान्या लग्न समारंभालाही आता
मर्यादा आल्या आहेत. मागील दोन दिवसांत तब्बल तीन हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात पावणे तीनशेच्या दरम्यान रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासांत १३५ रुग्ण सापडले असून ४२ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात रुग्णसंख्येत गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे.

Comments