द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन रत्नागिरीचा पत्रकार सन्मान पुरस्कार नरेश पांचाळ यांना जाहिर
रत्नागिरी दि.१ प्रतिनिधी
द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन संस्थेच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्यावतीने दैनिक सकाळचे पत्रकार नरेश पांचाळ यांना पत्रकार सन्मान पुरस्कार ज़ाहिर झाला असल्याची माहिती
द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन संस्थेचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी दिली.
द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन या राज्यव्यापी पत्रकार संघटनेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी यंदा ज़ाहिर झाली.दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पहिला पत्रकार सन्मान पुरस्कार जाहिर करण्यात आला.२० वर्षांपेक्षा अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे नरेश पांचाळ यांची पत्रकार सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पत्रकारितेबरोबरच सांस्कृतिक चळवळीतही पांचाळ यांचा सहभाग आहे.ते स्वत: मूर्तीकार आहेत.रत्नागिरीतील नाट्यचळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.ते रंगभूषाकार आहेत.रत्नागिरीत चित्रित झालेल्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी रंगभूषाकाराची भूमिका बजावली आहे.अनेक नाटकांना त्यांनी रंगभूषा केली आहे.शामाची शाळा या चित्रपटाची रंगभूषा पांचाळ यांनी केली आहे.त्याचबरोबर अलीकडे व्यवसायिक रंगभूमीवर आलेल्या भयंकर आनंदाचा दिवस नाटकासाठी पांचाळ यांची रंगभूषा आहे.पाजपंढरीतील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सलग तीन वेळा रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक,कामगार कल्याणच्या लावणी स्पर्धेत संवादिनी वादनासाठी प्रथम पारितोषिक पटकावले आहे.एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
बाळशास्त्री जांभेकरांच्या निवासस्थानी भेट देणार
द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन संस्थेची जिल्हा कार्यकारिणी स्थापन झाल्यानंतर पहिल्या पत्रकार दिनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील निवासस्थानी दि.६ जानेवारी रोजी द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन संस्थेची दक्षिण जिल्हा कार्यकारिणी भेट देणार आहे.याठिकाणी पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर यांच्या हस्ते नरेश पांचाळ यांना पत्रकार सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment