साखरी नाटे येथे उद्यापासून मच्छिमार बांधवांचे साखळी उपोषण
नविन मत्स्य कायद्याच्या विरोधात राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघ साखरी नाटेच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण छेडण्यात येणार आहे. येथील परवाना अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण छेडण्यात येणार आहे. मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण, पर्ससीन नौकांवर होत असलेली एकतर्फी कारवाई बंद करावी, सर्व मासेमारी प्रकारांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय पर्ससीन नौकांवर कोणतीही कारवाई करु नये. अशा विविध मागण्यांसाठी मच्छिमार बांधव साखळी उपोषण छेडणार आहेत.
Comments
Post a Comment