देशात करोना संसर्गाचा वेग वाढला; गेल्या २४ तासांत रुग्णांच्या संख्येत ५६ टक्के वाढ, ९० हजार बाधितांची नोंद




देशात करोना संसर्गाचा वेग वाढला; गेल्या २४ तासांत रुग्णांच्या संख्येत ५६ टक्के वाढ, ९० हजार

बाधितांची नोंद देशात ओमाक्रॉनच्या बाधितांचा आकडा २६०० च्या पुढे गेला आहे.


ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे देश-विदेश करोना रुग्णांचा मोठा स्फोट झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात करोना संसर्गाचे ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत ५६ टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमाक्रॉनच्या बाधितांचा आकडा २६०० च्या पुढे गेला आहे. देशात सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात करोनाचे ९० हजार ९२८ रुग्ण आढळले आहेत.


देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ३२५ लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाख ८५ हजार ४०१ झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ८७६ झाली आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी १९ हजार २०६ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले होते. त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत अँटी-करोना व्हायरस लसींचे १४८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ९१ लाख २५ हजार ९९ डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत १४८ कोटी ६७ लाख ८० हजार २२७ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या २६३० प्रकरणांची नोंद

देशात आतापर्यंत २६३० लोकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. देशात या प्रकाराची लागण झालेल्या राज्यांची संख्या २६ झाली आहे. सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत. यानंतर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ७९७, दिल्लीत ४६५ आणि राजस्थानमध्ये २३६ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

Comments