पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, "येवढे" पाक सैनिक ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला असून त्यात १० जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या अशांत दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील केच जिल्ह्यात हा हल्ला झाला. जेव्हा सुरक्षा दलाच्या एका चेक पोस्टला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी या हल्ल्याची माहिती दिली. लष्कराचा मीडिया विभाग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने सांगितले की, दहशतवाद्यांनी 25-26 जानेवारीच्या मध्यरात्री हा हल्ला केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले, तर लष्कराने केलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला आणि अनेक जण जखमी झाले.
टॉप 10 व्हायरल बातम्या . 40 9003 <8 : लाईक करा डिसलाईक टिप्पण्या व्हॉटस्अॅप शेअर करा
करा

Comments