अलिमियां काझी
▪️ *6 जानेवारी 1986- 6 जानेवारी 2022*
या 35 वर्षी पुर्वी आमचे मित्र अलिमियां ईब्राहीम काझी यांनी रत्नागिरी सेवक या नावाचे मराठी साप्ताहिक सुरु करून पत्रकारीतेला सुरुवात केली होती. त्यानंतर कोकणातील पहिले सांज दैनिक सुरु केले,तसेच रत्नागिरी टाईम्स आणि आज के.टीव्ही चे संपादक म्हणून काम करीत आहेत. मागे वळून पाहता खर्या अर्थाने मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा दमदारपणे जपण्याचे काम वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी करीत आहेत.सडेतोड लेखणी, बिनधास्तपणा आणि सामने कोण आहे हे न पाहता थेट परखडपणे प्रश्न विचारणे ही अलिमियां काझी यांची खासियत आहे..
आज पत्रकार दिन आहे,म्हणून मनापासून शुभेच्छा... आपली लेखणी अशीच सुरु राहुदे आणि सर्व पत्रकारांना ही पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
*डॉ, दिलीप पाखरे, रत्नागिरी*
Comments
Post a Comment