रत्नागिरी कॉंग्रेस भुवन येथे डिजिटल सभासद नोंदणीसाठी महत्त्वाची बैठक संपन्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार रत्नागिरी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सभासद नोंदणी प्रशिक्षणासाठी महत्वाची बैठक काँग्रेस भवन कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळेस जिल्हा परिषद गटाप्रमाणे बूथ लेवल बूथ नोंदणी अधिकारी नेमण्यासाठी केलेल्या नोंदणी गट प्रमुख यांना बोलावण्यात आले होते. डिजिटल सभासद नोंदणी कशी करायची याची आश्वासक माहिती मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी दिली. तदप्रसंगी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दिपक राऊत, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, अब्बास आंबेडकर, राकेश चव्हाण, जिल्हा परिषद गट सभासद नोंदणी प्रमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments