कोकण विभाग बूस्टर डोसमध्ये अग्रेसर

ओमिक्रॉन या कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच ६० वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली. 

या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात आतापर्यंत ६८ हजार ८२८ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६ हजार ४१९ तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील ४३ हजार ६५८ नागरिकांना बुस्टर डोस घेतला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Comments