'मन की बात' ला संगमेश्वर तालुक्यात जोरदार प्रतिसाद


संगमेश्वर: 
देशात आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नवीन वर्षातील पहिल्या 'मन की बात' कार्यक्रमाचे आकाशवाणीवरून प्रसारण झाले. आज गांधी जयंती असल्याने नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीरा प्रसारण होणार होते. सकाळी ठीक 11:30 ला कार्यक्रमाची सुरूवात झाली. यामध्ये मा. पंतप्रधानांनी विविध राष्ट्रीय पुरस्कार आणि त्या विजेत्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत यश संपादन केले, याविषयी माहिती दिली.
     यासोबतच विद्यांजली अभियानांतर्गत राबवण्यात येणार्‍या कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. सोबतच 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या कार्यक्रमांतर्गत एक कोटीहून अधिक पत्र आल्याचे सांगत त्यापैकी काही पत्रांचे वाचनही केले. काजीरंगा अभयारण्याचे वर्णन करणारे भारतरत्न भूपेन हजारिकाजी यांचे "काज़ीरोंगार हिरो सेउज पोरिबेश" हे गीत ऐकायला मिळाले.
     संगमेश्वर तालुक्यात गेला पूर्ण आठवडा भाजप कार्यकर्ते 'मन की बात' कार्यक्रम नागरिकांनी ऐकावा यासाठी जनजागृती करत आहेत. सोशल मिडिया, वृत्तपत्रे, प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीच्या माध्यामातून संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवत होते. आज कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील प्रत्येक बूथवर लहानमोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पाहिला गेला. 'मन की बात प्रकोष्ठ'चे तालुका संयोजक मिथुन निकम यासंदर्भात कार्यकर्त्यांना नियमितपणे मार्गदर्शन करत होते. आगामी काळात यापेक्षाही जास्त संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित रहातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments