रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये र.ए. सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेचे तब्बल 28 विद्याथी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले. 
कोविड 19 च्या अतिशय कठीण काळात 10 वी, 12वी च्या परीक्षा रद्द झालेल्या असताना शिष्यवृत्ती ची परीक्षा होईल की नाही अशी साशंकता असतानाही विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. इयत्ता 8वी मधील कु. अनिशा प्रसाद आंबेकर ही विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत 9वी आली असून एकूण 18 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले तर इयत्ता 5 वीचे 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले.
कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग प्रशालेतील शिक्षक सातत्याने घेत होते. 15 मे पर्यंत चालू असलेले हे वर्ग पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर सुरू करून विद्यार्थ्यांची मानसिक आणि शैक्षणिक तयारी करून घेण्यात आली. प्रश्नपत्रिकांचा सर्व करून शंका निरसन करणे सातत्याने चालू ठेवले. विद्यार्थ्यांनी चिकाटीने केलेले प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन, शाळेच्या व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य व पाठिंबा या सर्वांमुळे हे उत्तम यश मिळाले त्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Comments