आजची रेसिपी:दुधी भोपळ्याचे धिरडे

साहित्य:
• १/४ कि. दुधी भोपळा
• आले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट
• मीठ
• २ वाट्या रवा
• २ चमचे तांदळाचे पीठ 

कृती:
• प्रथम दुधी किसून घ्यावा व वरील सर्व मिश्रण एकत्र करावे आणि डोसाच्या पिठाप्रमाणे मिश्रण करुन घ्यावे.
• नंतर निर्लेप तव्यावर पातळ धिरडे घालावेत.
• गरमागरम टोमेटो सॉसबरोबर सर्व्ह करावे

Comments