पाकिस्तानच्या मदतीने चीनचा भारताविरोधात घाणेरडा प्लान!

⏺️….म्हणून रणगाडे आणि रॉकेट लाँचर दिले; पाकिस्तानच्या मदतीने चीनचा भारताविरोधात घाणेरडा प्लान!

⏺️चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरुद्ध कट रचत आहेत. पाकिस्तान हा देश सतत भारतासोबत संघर्षात लिप्त असायला हवा, असा चीनचा मनुसबा आहे. याच उद्देशाने चीनने पाकिस्तानला माऊंटेड हॉवित्झर रणगाडे दिले आहेत. शिवाय, पाकिस्तानला एआर-1 (300 एमएम) मल्टी बॅरल रॉकेट लाँचरही देण्याच्या तयारीत चीन आहे. या शस्त्रास्त्र कराराचे मूल्य जवळपास 51.2 कोटी डॉलर्स असल्याचे समजते

बीजिंग : 
चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरुद्ध कट रचत आहेत. पाकिस्तान हा देश सतत भारतासोबत संघर्षात लिप्त असायला हवा, असा चीनचा मनुसबा आहे. याच उद्देशाने चीनने पाकिस्तानला माऊंटेड हॉवित्झर रणगाडे दिले आहेत. शिवाय, पाकिस्तानला एआर-1 (300 एमएम) मल्टी बॅरल रॉकेट लाँचरही देण्याच्या तयारीत चीन आहे. या शस्त्रास्त्र कराराचे मूल्य जवळपास 51.2 कोटी डॉलर्स असल्याचे समजते

चीन आता पाकिस्तानला लढाऊ विमाने, डिस्ट्रॉयर्स आणि डीएफ-17 हायपरसोनिक क्षेपणास्त्रे देण्याचीही योजना आखत आहे. पाकिस्तानने युद्धात कुठल्याही पातळीवर भारतापेक्षा कमकुवत ठरता कामा नये, या उद्देशानेच चीन ही आयुधे पाकिस्तानी लष्कराला उपलब्ध करून देत आहे. भारताच्या भात्यातील ‘एस-400 एअर मिसाईल डिफेन्स सिस्टीम’चे आव्हानही पाकला पेलता यावे, हा चीनचा यामागे हेतू आहे.

भारत एकाचवेळी दोन आघाड्यांवर गुंतलेला राहावा, हाही चीनचा उद्देश आहेच. पाकिस्तान एक अण्वस्त्रसज्ज देश असणे हे चीनच्या द़ृष्टीने फायद्याचे आहे. पारंपरिक युद्धासाठी चीन पाकला 1990 पासूनच शस्त्रास्त्रे पुरवत आहे. 2019 मध्ये चीनमधील शस्त्रास्त्र निर्माता कंपनी ‘नोरिन्को’सोबत पाकने एक करार केला होता. त्यांतर्गत पाकला ही नवी आयुधे मिळत आहेत.

शिवाय एआर-1 हॅवी रॉकेट लाँचरही पाकला मिळणार आहे. 53 किलोमीटरपर्यंत या लाँचरची मारकक्षमता असेल. हायपरसोनिक मिसाईल डीएफ-17 च्या साहाय्याने पाक भारताच्या ‘एस-400’ला चकवा देऊ शकेल. चीनने 2014 पासून आजपावेतो 9 वेळा या मिसाईलची चाचणी घेतली आहे. याची मारकक्षमता 1,950 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते.

भारताकडे अनेक हायपरसोनिक मिसाईल आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये भारताने ‘हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल’ची यशस्वी चाचणी घेतली होती. पाक आणि चीनच्या तयारीला जशास तसे उत्तर देण्यासाठी ‘डीआरडीओ’चा स्वदेशी प्रकल्पही सज्ज आहे.

पाकिस्तानला व्यापारापासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत मदत करणारा चीन आता त्याच्यासोबत अंतराळ मोहीमेतही मदत करणार आहे. इस्लामाबादच्या सहकार्याने ते अंतराळ कार्यक्रम पुढे नेणार असल्याचे चीनच्या वतीने सांगण्यात आले आहे. पाकिस्तानसाठी स्पेस स्टेशन बांधण्यापासून ते अधिकाधिक उपग्रह सोडणार असल्याची घोषणा चीनने शुक्रवारी केली.

चीनच्या स्पेस प्रोग्रॅम 2021 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेत पाकिस्तानचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, चीन पाकिस्तानसाठी उपग्रह विकसित करणे आणि स्पेस स्टेशन बांधणीसाठी सहकार्य करणार आहे. याशिवाय येत्या पाच वर्षांत काम आणखी वाढवणार आहेत. चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चीनने चंद्र आणि मंगळावरील आपली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

Comments