राजापूर तालुक्यात खाजगी जमीनीत टाकलेल्या महानेटच्या पोल बाबत चौकशी करण्याचे उपजिल्हाधिकारी यांचे आदेश
राजापूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीना ऑनलाईन जोडणीसाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी साहयाने प्रकल्पला संपुर्ण महाराष्ट्र सहित रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यात देखील सुरुवात केली होती, राजापूर तालुक्यातील जमिनि चे भु-संपादन झाले नसल्याने ह्या सर्वच जमिनी ह्या खाजगी स्वरुपाच्या आहेत.
स्टरलाईट या कंपनीनेच्या ठेकेदाराने राजापूर मधील कोणत्याही खाजगी जमीन मालकास विचारात न घेता त्या ठिकाणी अनधिकृत पणे पोल उभे केले आहेत. शासनाचा ह्या अनधिकृत धोरणाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र सचिव समिर विजय शिरवडकर यांची आवाज उठवला होता. माहिती आणि तंत्रज्ञान विभाग रत्नागिरी, आणि महाआयटी मुंबई विभाग यांच्याकडून या बाबत तक्रार दाखला करून, त्या बाबत जमिन मालकांचे हरकती सुध्दा दाखल केले होते.
सदर, तक्रार आणि हरकती बाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभाग रत्नागिरी यांनी वेळोवेळी सा.बा. उत्तर विभाग रत्नागिरी, राजापूर तहसिल दार,आणि सा. बा. विभाग राजपूर यांना कळीत केली आहे. असा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी चें सुशांत खाडेकर यांनी आपल्या पत्रानुसार दिले आहेत, या वरून राजपूर च्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे समीर शिरवडकर यांनी बोलतांना सांगितले.
Comments
Post a Comment