नितेश राणेंना झटका? सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळत दिले 'हे' आदेश. जाणून घ्या!
सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने भाजप आमदार नितेश राणेंना मोठा झटका बसला आहे. पण यासोबतच सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंवर आरोप आहेत. या प्रकरणी गेल्या महिन्यात नितेश राणेंवर सिंधुदुर्गात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा सत्र न्यायालय, हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. तसंच नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे आणि न्यायालयाकडे जामीन अर्ज द्यावा, असे सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment