माणुसकीची भिंत
*माणुसकीची भिंत*
*गुंफण फाउंडेशन चे दातृत्वाला सलाम...!*
*मी माझे व्हॉटसअप स्टेटस ला काही दिवसापूर्वी म्हणजेच डिसेंबर 021 मध्ये अवकाळी पाऊस आले मुळे ऊस तोड कामगारांचे होणारे हाल याबाबत* गोड साखरेची कडू कहाणी *चे वस्तुस्थिती मांडणारे व्हिडिओ स्टेटस ला शेअर केले होते.*
*ते स्टेटस ,व्हिडिओ पाहून आमचे मित्र श्री.सुजित साळोखे व त्यांचे मित्र परिवार - गुंफण फाउंडेशन, कोल्हापूर यांनी कोल्हापूर परिसरातील ऊस तोड कामगार यांना 125 ब्लँकेट आणि 60 Kg धान्य स्वरूपात मदत वाटप केली.*
*श्री.सुजित साळोखे आणि गुंफण फाउंडेशन, कोल्हापूर यांचे दातृत्वाला सलाम...!*
*धन्यवाद..श्री.सुजित साळोखे आणि गुंफण फाउंडेशन, कोल्हापूर.*
सन 2019 व 2021 मध्ये ही कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूर वेळी ही सोशल मीडिया माध्यमातून मदतीची हाक दिली होती..त्यावेळी ही शेकडो लोकांनी मदतीचा हात दिला..
आता ऊस तोड कामगार यांचे बाबत ही वस्तुस्थिती मांडणारे व्हिडियो पाहून गुंफण फाउंडेशन यांनी ही मदत दिली..खरंच ज्या समाजाने आपलेला घडवले त्या समाजाच्या अडचणी च्या वेळी आपण त्यांचे दुःख दूर करणे करिता एक मदतीचा खारीचा वाटा उचलतो...या गोष्टी मनाला लाख मोलाच्या समाधान देतात..🙏
*खरच...आपले कडे असणाऱ्या साधनाचा योग्य वापर करून ज्या समाजात आपण राहतो,ज्या समाजा मुळे आपण घडलो..त्यांचे अडचणी वेळी आपण खारीचा वाटा होऊन अशा स्वरूपात मदत करू शकलो याचा अभिमान वाटतो...!*
🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment