राजापूर महावितरण कार्यालयाच्या वतीने केळवली गावात राबवण्यात आले 'एक गाव-एक दिवस' अभियान

गुरुवार दि.20 जानेवारी रोजी सकाळी ठीक 09:00 वाजल्यापासून ते सायंकाळी 06:30 वाजेपर्यंत संचालक (संचालन)  महावितरण, मुंबई यांच्या दि.31/12/21 च्या आदेशानुसार राजापूर तालुक्यातील केळवली गावात महावितरण उपविभाग २ च्या वतीने "एक गाव एक दिवस अभियान" राबविण्यात आले.
"एक गाव - एक दिवस" या अभियानंतर्गत शाखा कार्यालय हातिवले व बिलिंग स्टाफ उपविभाग राजापूर (२) यांनी संयुक्तपणे खालील प्रमाणे कामे केली.
1. ग्राहकांच्या वीज बिल विषयक तक्रारींचे निराकरण करून बिल दुरुस्ती करण्यात आली.
2. तात्पुरत्या स्वरूपातील वीज खंडित ग्राहकांचे वीज बिल वसुली करण्यात आली.
3. 15 नादुरुस्त मीटर बदलण्यात आले.
4. लघुदाब वाहिन्यांवरील ट्री कटिंग करण्यात आली.
5. विद्युत रोहित्र वितरण पेटी मधील फ्यूज, केबलला नवीन Lugs बदली करून रोहित्राची जागा साफ-सफाई करण्यात आली.
6.लघुदाब वाहिन्यांच्या लूज गाळ्यातील तारा ओढण्यात आल्या.
7.शुन्य व १-३० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांच्या स्थळ तपासणी केली.
8. विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत सुरक्षा संबंधित ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. 
9. गावातील गंजलेले विद्युत खांब आणि रोहित्राची स्थळ परीक्षण करून घेतले.
10. गावातील गंजलेले लघुदाब् वाहिनीचे ७ पोल बदलण्यात आले.
11.ग्राहकांना महावितरण मोबाइल अँप प्रामुख्याने Online Payment याबद्दल माहिती देऊन वापरण्याचे आवाहन केले . 
1‌2.या अभियानामध्ये  केळवली गावामधील सरपंच , उपसरपंच , जिल्हापरिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत बैठक पार पाडून वेगवेगळ्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्या समस्यांचे  निराकरण करण्यात आले.                      
13.कृषी पंप वीज धोरण २०२० याबद्दल माहिती देऊन थकबाकी भरून वीज बिल थकबाकी मुक्त होण्यासाठी आव्हान केले .
14.विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ आणि १३५ विषयी माहिती देऊन वीज चोरी टाळण्याचे आव्हान केले.
15. अभियानाची सांगता हे गावाचे सरपंच यांनी महावितरण चे आभार मानून केले.
सदर कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती सौ.भारती सरवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तात्या सरवणकर, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, योगेश ठाकरे, श्री कदम, आदी उपस्थित होते.

Comments