मोटरसायकल अपघातात तरुण ठार

चिपळूण 30 जानेवारी: 
चिपळूणात दुचाकीच्या धडकेत एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल धोंडू आग्रे (29, रा. कौंढरताम्हाणे, शंकरगल्ली, चिपळूण) हा कारुळ ते कौंढरताम्हाणे असा पल्सरवरुन आपल्या घरी जात होता. यावेळी मढाळ गावाचे सीमेवर बोऱ्या फाटा येथे आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडली. यामध्ये त्याला जोरदार मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास घडला. त्याचा मृतदेह 27 जानेवारी रोजी 8.30 वा. सुमारास नातेवाईकांना दिसून आला.

याबाबतची फिर्याद पोलीस नाईक अजित कदम यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार आग्रे याच्यावर भादवि कलम 304 (अ), 279, 337, 338 पमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments