रत्नागिरी:एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर उडी मारताना पडून पाण्यात बेपत्ता झालेल्याचा मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरकरवाडा जेटी येथे एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर उडी मारताना पाय घसरुन बोटीवर डोके आदळून पाण्यात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना शुकवार ७
जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. घडली होती.

या खलाशाचा मृतदेह रविवारी सकाळी ७.४५ वा. आढळून आला.संजित फुलराम थारु चौधरी (२०, मुळ रा.नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे.या बाबत सुबहान लियाकत मस्तान (२६, रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे खबर दिली आहे.त्यानुसार शुक्रवारी सकाळी संजित चौधरी मिरकरवाडा जेटी येथील लियाकत मस्तान यांच्या बोटीवरून दुसऱ्या बोटीवर जात असताना त्याचा पाय घसरला. त्यामुळे त्याचे डोके बोटीवर आपटून तो पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी समुद्राच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळन आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Comments