आजाराला कंटाळून लांजात एकाची गळफास घेत आत्महत्या

लांजा:आजाराला कंटाळून ५५ वर्षीय प्रौढाने खोलीच्या लाकडी खांबाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. बाळासाहेब श्रीपाळ शेट्ये ( सध्या रा. लांजा भटवाडी , मूळ रा.
सड्ये , रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. बाळासाहेब शेट्ये हे अॅड. निरंजन देशमुख यांच्या चाळीमध्ये १९९३ पासून राहत होते. गेल्या दोन
वर्षांपूर्वी ते तोंडाच्या कॅन्सरने आजारी होते. त्यांच्यावर डेरवण व रत्नागिरी येथे उपचार सुरू होते. ते एकटेच भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. शनिवारी रात्री १ ते रविवारी सकाळी ८ वाजेदरम्यान रुमच्या लाकडी
बारला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावला. याची माहिती अॅड. निरंजन देशमुख यांनी लांजा पोलिसांना
दिली. लांजा पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करीत
आहेत. आत्महत्येचे कारण उलगडलेले नसले तरी आजारपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे.

Comments