देवरुख शहर विकासासाठी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी घेतली सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत आमदार शेखर निकम यांची भेट
देवरुखच्या नगराध्यक्षा सौ मृणाल अभिजीत शेट्ये यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. या भेटीत देवरुख शहरातील विविध विकास कामासाठी निधीची मागणी करत शहर विकासाच्या अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील कार्यालयात ही भेट झाली. आमदार महोदयांनी देखील देवरुख शहराच्या विकासा आड कोणतेही राजकारण येऊ देणार नसल्याचे सांगितले व देवरुखला भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी नगरसेवक प्रफुल भुवड, राजेश गवंडी, उल्हास नलावडे, अनुराग कोचिरकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष हनीफ शेठ हर्चिरकर, व्यापारी संघटना अध्यक्ष बाबा शेठ सावंत, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये , बाळूशेठ ढवळे, सागर संसारे, पंकज पुसाळकर, निलेश भुवड राजू वनकुद्रे, बापू नलावडे, शेखर नलावडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment